The start

गुरफटू नकोस या रस्त्यान मध्ये
प्रश्नन पडतील अनेक
उत्तर त्याचे बाहेर नाही
मनातच आहे तू शोध रे
लख लख न्याऱ्या स्वप्नांना वर नको
संकोच तू करुस
होतील सगळे खरे
चल आपण प्रयत्न तरी करू
घेशील तू तो श्वास मोकळा
यश स्वप्नाचे लागेल वाहू
धक धक न्याऱ्या त्या भीती ला सांग तू
आता मला नको आडवु
लांबचा तो प्रवास सुरु कर
घे धाडस पाठीशी बांधून
अपयशाच्या खड्यानं मध्ये
कधी अडकून नको जाऊस
सरळ मार्ग नाही हा
बिथरुन तू जशीलच
वेळ देउनी स्वतःला थोडा
घे पुन्हा तू पुढचे पाऊल